Sun, Jul 21, 2019 01:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आयाराम होताहेत भाजपला डोईजड

आयाराम होताहेत भाजपला डोईजड

Published On: Apr 10 2018 9:54AM | Last Updated: Apr 10 2018 9:54AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

भाजपने अन्य पक्षातील आयात नेत्यांच्या ताकदीवर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळविले असले तरी आता या आयात नेत्यांमुळे भाजपला बदनामीचा सामना करावा लागत आहे. अहमदनगरमध्ये माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काढलेल्या अनुद्गारामुळे वातावरण शांत होत नाही तोपर्यंत पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असलेले आणि राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना अहमदनगरमधील दुहेरी खुनाप्रकरणी अटक झाल्याने भाजपच्या स्वच्छ प्रतिमेच्या दाव्याला तडा गेला आहे.

विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिक पत्नींबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याने राज्यभर संताप निर्माण झाला होता. त्याचे तीव्र पडसाद विधिमंडळात उमटले. परिणामी परिचारक यांचे सदस्यत्व निलंबित करण्यात आले. परिचारक यांना विधान परिषद निवडणुकीत भाजपने पुरस्कृत केले होते. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यापूर्वी त्यांनी भाजपवर शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावरून येथेच्छ टीका केली. आता काटोलचे आमदार डॉ. आशिष देशमुख हे देखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पक्षाला अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. 2014 च्या निवडणुकीपूर्वी डॉ. आशिष देशमुख काँग्रेसमधून भाजपमध्ये आले. भाजपवर शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत डॉ. देशमुख यांनी आंदोलन पुकारले होते. त्यांच्या आंदोलनात भाजपचे नाराज नेते माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिंन्हा हे देखील सहभागी झाले होते. 

Tags : BJP, shripad chindam, Shivaji Kardile