Thu, Mar 21, 2019 00:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्याच्या मुख्य सचिवांसोबत बेस्‍ट शिष्टमंडळाची बैठक

राज्याच्या मुख्य सचिवांसोबत बेस्‍ट शिष्टमंडळाची बैठक

Published On: Jan 12 2019 12:09PM | Last Updated: Jan 12 2019 12:09PM
मुंबई : प्रतिनिधी

बेस्‍ट कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाचा आज पाचवा दिवस. राजकीय आणि प्रशासनाच्या बैठका होऊनही यावर अजून तोडगा निघाला नाही. आज राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन, परिवहन सचिव आशिष कुमार सिंग, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, बेस्ट व्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे आणि बेस्ट कामगार कृती समितीचीच्या शिष्टमंडळांसोबत बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीतून आज तोडगा निघण्याची शक्यता व्‍यक्‍त करण्यात येत आहे. 

मंत्रालायत मुख्य सचिवांच्या दालनात बैठकीला सुरुवात झाली आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी बैठकील उपस्‍थित असून या बैठकीनंतर तोडगा निघाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.