अयोध्या निकालानंतर सर्व न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ

Last Updated: Nov 09 2019 7:20PM
Responsive image
(डावीकडून ते उजवीकडे) न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती एस.ए. बोबडे, सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर.


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

अयोध्यावरील निकालाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्लीत हलचालींनी वेग पकडला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर देशातील तसेच महत्त्वाच्या शहरांमधील वातावरण बिघडू नये या दृष्टीने गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीस रॉ, आयबीचे प्रमुख अरविंद कुमार, गृहसचिव अजित भाल्ला आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित होते. या बैठकीनंतर राम मंदिरासंदर्भात निकालाचे वाचन करणा-या खंडपीठातील सर्व न्यायाधीशांची सुरक्षा वाढविण्यात आली.

सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत शहा यांनी काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि परिस्थितीची माहिती घेतली. शहा यांनी त्यांना पोलिस व प्रशासन सतर्क रहावे आणि कोणतीही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पाहता अमित शहा यांनी दिवसभर आपले इतर सर्व कार्यक्रम आणि सभा रद्द केल्या.

अयोध्येच्या निकालानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना देण्यात आलेली झेड सुरक्षा वाढवून झेडएड प्लस करण्यात आली आहे. खंडपीठातील अन्य न्या. एस. ए. बोबडे, न्या. एस. वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. के. अब्दुल नजीर यांच्या घराबाहेर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. सर्व न्यायाधीशांची सुरक्षा वाय श्रेणीतून वाय प्लसपर्यंत वाढविण्यात आली आहे. गृहमंत्रालयाच्या एका अधिका-याने सांगितले की, गृहमंत्र्यांनी देशातील विशेषत: उत्तर प्रदेशातील सध्याच्या कायदा व सुव्यवस्थेविषयी सविस्तर माहिती घेतली.

'राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे राणे महान नेते नाहीत'


'ती क्लिप माझी आहे का नाही? हे माहीत नाही'


भारताचे चीनला चोख प्रत्युत्तर; 'हा' घेतला निर्णय!


देशातील कोरोनाबाधितांची संख्या दीड लाखाच्या उंबरठ्यावर


जिल्‍हास्‍तरीय कोविड-१९ लॅब का नाही? हायकोर्टाचा राज्‍य सरकारला सवाल 


'देश कोरोनाच्या संकटात, पण काँग्रेसला राजकारण करण्याशिवाय दुसरे काही सुचत नाही'


निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थव्यवस्‍थेचे भले होणार नाही : पृथ्‍वीराज चव्हाण 


'चारधाम' यात्रेचा प्रवास झाला सुकर


खोटा प्रचार करुन केंद्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा


चाळीस लाखांहून अधिक प्रवासी मजूर पोहोचले स्वगृही; धावल्या ३ हजार ६० विशेष श्रमिक ट्रेन