होमपेज › Mumbai-Thane-Raigad › औरंगाबाद कचरा प्रश्नी धनंजय मुंडेंचा स्थगन प्रस्ताव

औरंगाबाद कचरा प्रश्नी धनंजय मुंडेंचा स्थगन प्रस्ताव

Published On: Mar 15 2018 1:05PM | Last Updated: Mar 15 2018 1:15PMमुंबई : प्रतिनिधी

औरंगाबादमध्ये कचरा प्रश्नाच्या समस्येवर जनतेच्या आंदोलनानंतर पोलिसांनी कायदा हातात घेवून लोकांना मारहाण केली. याप्रकरणी त्यांच्यावर सरकार कारवाई करत नाही. गणवेश घालून पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले, गाड्या फोडल्या, महिला-मुलांना अमानुष मारहाण केली. पोलिसांनी केलेल्या या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. यावर सरकार काय कारवाई करणार यासाठी २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडून सभागृहात चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

स्थगन प्रस्तावावर चर्चा होत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी सरकारने निवेदन करुन ९७ अन्वये चर्चा करण्याची मागणी केली. या मागणीनंतर सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवले असून पोलिस आयुक्तांच्या चौकशीसाठी एसीएस होम आणि डीजी यांची समिती स्थापन करण्याची घोषणा केली. याबाबत आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण आक्रमक झाले होते.