Wed, Apr 24, 2019 15:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ट्रक, डंपर चोरीप्रकरणी औरंगाबादच्या  नगरसेवकाला भिवंडी पोलिसांकडून अटक

ट्रक, डंपर चोरीप्रकरणी औरंगाबादच्या  नगरसेवकाला भिवंडी पोलिसांकडून अटक

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 07 2018 1:20AMभिवंडी : वार्ताहर 

ट्रक, डंपर चोरी करून ते बनावट कागदपत्रांच्या आधारे नव्या ग्राहकांना विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश भिवंडी गुन्हे शाखेने मागील महिन्यात केला. या गुन्ह्यात आता औरंगाबाद महापालिकेतील एमआयएमचे नगरसेवक शेख जफर शेख अख्तर यास भिवंडी गुन्हे शाखेने अटक केली असून 34 हुन अधिक ट्रक, डंपर ताब्यात घेण्यात आले आहेत. 

भिवंडी गुन्हे शाखे कडून  एक चोरीची बाईक ताब्यात घेण्यात आली होती. तिच्या डिक्कीत ट्रकची कागदपत्रे आढळून आली होती. ही कागदपत्रे नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयातील असल्याने तेथे संबंधित कागदांची खातरजमा केली असता ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी  गुन्हे शाखेने नारपोली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता त्याची पाळेमुळे बुलडाणा, नागपूरपर्यंत पसरल्याचे उघड झाले. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी बुलडाणा आरटीओ येथून बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी झालेल्या पाच ट्रकची माहिती मिळविली.  तेथील दोन आरटीओ एजंट यांना ताब्यात घेत पुढे तपासात नागपूर आरटीओ येथील कारकून यास ताब्यात घेतले असता तब्बल 34 हून अधिक ट्रक, आयवा डम्पर या टोळीने त्यांचे मूळ, चेसीस नंबर, इंजिन नंबर नष्ट करून नवे बनावट नंबर टाकून त्यांची नव्याने रंगरंगोटी केली.

हे ट्रक, डम्परऔरंगाबाद येथील एमआयएम नगरसेवक शेख जफर शेख अख्तर आणि त्याचा भाऊ बाबर शेख हे ग्राहकांची फसवणूक करून विक्री करीत असल्याचे समोर आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी सांगितले. 

Tags : Mumbai, mumbai news, Aurangabad corporator, arrested, Bhiwandi police,  truck, dumpper theft,