Sun, Apr 21, 2019 13:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › औरंगाबाद हिंसाचार : ACP गोवर्धन कोळेकर यांना मुंबईला हलवले

ACP गोवर्धन कोळेकर यांना मुंबईला हलवले

Published On: May 14 2018 10:36AM | Last Updated: May 14 2018 10:40AMमुंबई : प्रतिनिधी 

औरंगाबादेत अनधिकृत नळ कनेक्शनाच्या किरकोळ वादातून उसळलेल्या दंगलीवर नियंत्रण मिळवताना जखमी झालेल्या सहाय्यक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईला हलवण्यात आले. औरंगाबादवरून खास एअर अँब्यूलन्सने त्यांना मुंबईला आणण्यात आले. जखमी झाल्यानंतर तब्बल १२ तासांनी ते शुद्धीवर आले होते. 

मोतीकारंजा गांधीनगरात प्रचंड जमाव एकत्र आल्याची माहिती मिळताच शहर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर त्या भागात दाखल झाले, मात्र तेथील जमावातून आलेला एक मोठा दगड त्यांच्या छातीत लागला होता. या दगडाचा मार इतका जोरात होता की त्यांचा गळा आणि स्वरयंत्रणेला जखम झाली होती. रविवारी त्यांच्यावर स्वरयंत्रणेची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. प्रकृती स्थिर असून त्यांना आज पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले. 

किरकोळ कारणावरून दोन गटातील वादातून केलेल्या दगडफेकीत अनेक नागरिकांसह पोलिस कर्मचारी आणि अधिकारी देखील जखमी झाले आहेत. रविवारी अतिरिक्त महासंचालक बिपीन बिहारी, पोलिस आयुक्त मिलिंद भारंबेयांच्यासह सर्व अधिकार्‍यांनी त्यांची भेट घेतली. डॉक्टरांशी चर्चा करून कोळेकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.