Tue, Jan 22, 2019 18:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अथर्व वारंग मृत्यू प्रकरणाला कलाटणी?

अथर्व वारंग मृत्यू प्रकरणाला कलाटणी?

Published On: May 30 2018 2:14AM | Last Updated: May 30 2018 1:27AMडोंबिवली : वार्ताहर

डोंबिवली जवळच्या देसले पाड्यात राहणार्‍या सात वर्षीय अथर्व वारंग मृत्यू प्रकरणाला येत्या काही दिवसांत कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचा संशय वैद्यकीय अधिकार्‍यांनी व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी पोस्कासह 377 कलमाचा वापर केला आहे. मात्र या मुलाचा अत्याचार करून खून केला की त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला हे गुलदस्त्यात असून रासायनिक पृथ्थकरण अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाची दिशा ठरणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

देसलेपाड्यातील चाळीत राहणारा अथर्व वारंग हा मुलगा गुरूवारी 26 मे सकाळी 10 च्या सुमारास खेळताना अचानक बेपत्ता झाला. शुक्रवारी सकाळी 10.30 च्या दरम्यान नजीकच्या बांधकामाच्या ठिकाणी ड्रेनेजच्या टाकीतील पाण्यात त्याचा मृतदेह आढळला. इमारतीचे बांधकाम करणार्‍या बिल्डरच्या हलगर्जीमुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी महापौर विनीता राणे यांनी रविवारी मुलाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे हे देखील उपस्थित होते. मुलाचा मृतदेह जेथे आढळला, त्या जागेचीही महापौरांनी पाहणी केली. तेथे सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नव्हत्या. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असून त्यासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. बांधकाम करणार्‍या बिल्डरने परवानगी घेतली आहे का ? याची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करा, असे आदेश त्यांनी बेकायदा बांधकामविरोधी विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांना दिले.

याच दरम्यान केडीएमसीच्या रूक्मिणीबाई हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचे उघड झाल्याने हा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील सर जे. जे. हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला होता. त्यानंतर त्याचा व्हिसेरा कालिना येथील न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला.