Sun, Feb 17, 2019 05:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विमानतळावर महाराज उल्लेखासाठी आंदोलन

विमानतळावर महाराज उल्लेखासाठी आंदोलन

Published On: Jul 23 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 12:59AMमुंबई : प्रतिनिधी

अंधेरी येथील सहार विमानतळाचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले. परंतु यामध्ये ‘महाराज’ या उपाधीचा उल्लेख जीव्हीके कंपनीने अद्यापही केलेला नाही. या मागणीसाठी वॉच डॉग फाऊंडेशनचे संचालक गॉडफ्रे पिमेंटा आणि निकलोस अल्मेडा व सहार गावातील नागरिकांनी गांधीगिरी करत ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ अशा नावाचा 20 फुटी बॅनर लावून आंदोलन केले. 

या मागणीचे निवेदन पोलीस स्टेशन आणि जीव्हीके कंपनीला देण्यात आले. तसेच राज्य सरकारने या विमानतळाचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण येत्या 8 ते 10 दिवसांत न केल्यास वॉचडॉगचे सर्व कार्यकर्ते पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसतील, असा इशाराही अल्मेडा यांनी दिला.