Thu, Jun 27, 2019 11:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खंडणीच्या गुन्ह्यात पालिकेच्या सहाय्यक आयुक्ताला अटक

खंडणीच्या गुन्ह्यात पालिकेच्या सहाय्यक आयुक्ताला अटक

Published On: Apr 22 2018 8:08AM | Last Updated: Apr 22 2018 1:49AMनालासोपारा : वार्ताहर

वसई-विरारमध्ये खंडणीचे गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरू असून विरार पोलीस ठाण्यात वसई-विरार महापालिकेच्या प्रभारी सहाय्यक आयुक्तासह दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव याला शनिवारी (काल) पहाटे अटक करण्यात आली. विरार पश्चिमेतील धर्मेश गांधी यांनी विरार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई झाली. 

साई रिदम बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स हे मौजे विरार, मनवेलपाडा येथील सर्व्हे क्र. 143 हि.नं.2, 5/1, 6, 7, 9, 10 व 11 विकसित करत आहेत. या बांधकामावर गांधी हे देखरेख करत असताना प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधवने आणि नितीन मधुसुदन राऊत (रा.विरार) यांनी बांधकामच्या अनियमिततेबाबत पालिकेत तक्रार केली आणि 25 लाख रुपयांची मागणी केली. त्यातील पाच लाख रुपये जाधवने  स्वत:च्या कार्यालयात स्वीकारले. त्याच्या कार्यालयात असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींना दाखवून, ती नगरसेवक धनंजय गावडे याची माणसे असून उर्वरित रक्कम न दिल्यास ते माझ्या जीवाचे बरेवाईट करतील असे धमकावल्याचे गांधी यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

Tags : Mumbai,  Ransom crime, Assistant Commissionerof the police, arrested, Mumbai news,