Wed, Jun 26, 2019 17:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘नियुक्ती पत्र हवे असेल तर विदेशी दारू दे’

‘नियुक्ती पत्र हवे असेल तर विदेशी दारू दे’

Published On: Dec 17 2017 3:04AM | Last Updated: Dec 17 2017 11:12AM

बुकमार्क करा

ठाणे : खास प्रतिनिधी

मीरा-भाईंदर महापालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झालेल्या उमेदवाराला नियुक्तीचे आदेश पत्र देण्यासाठी विदेशी दारूच्या लाचेची मागणी करणारे पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख आरोग्य अधिकारी (प्रभारी) डॉ. प्रकाश हरिश्‍चंद्र जाधव यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.

मीरा-भाईंदर पालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकार्‍यांची भरती करण्यात आली आहे. नियुक्तीचे आदेश पत्र मिळण्यासाठी फेर्‍या मारल्यानंतर तक्रारदार डॉक्टरने आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांची भेट घेतली. डॉ. जाधव यांनी त्यांच्याकडे विदेशी दारूच्या लाचेची मागणी केली. त्याची किंमत 15 हजार 884 रुपये एवढी होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. एसीबीने सापळा रचून डॉ. जाधव यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सलील भोसले हे करीत आहे.