Wed, Apr 24, 2019 19:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›

अश्विनी बिद्रेंच्या मृतदेहाचा खाडीत पुन्हा शोध सुरू
 

अश्विनी बिद्रेंच्या मृतदेहाचा खाडीत पुन्हा शोध सुरू
 

Published On: Apr 05 2018 2:24AM | Last Updated: Apr 05 2018 1:57AMनवी मुंबई: प्रतिनिधी

ठाणे ग्रामीणच्या सहायक पोलीस  निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचा  ग्रॅडिओमीटरच्या सहाय्याने वसई- भाईंदरच्या खाडी किनारी बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून सहा तास शोध घेण्यात आला. यावेळी तपास अधिकारी एसीपी संगीता अल्फोन्सो उपस्थित असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

डुमिनिया एंटरप्रायजेस अ‍ॅण्ड डायव्हर्स एंटरप्रायजेस प्रा. लि. आणि नॅशनल  इन्स्टिट्युट ऑफ ओशिआनोग्राफी (एनआयओ) यांच्यामार्फत ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला प्रतिदिवस सुमारे दोन लाखांहून अधिक खर्च होणार आहे. या कंपन्या वसई-भाईंदर खाडीचा किमान आठ दिवस अभ्यास करणार आहेत. त्यामध्ये पाण्याचा प्रकार, दगड, माती आणि वारा कोणत्या दिशेने वाहतो याचा सखोल अभ्यास करून स्कॅनिंग करून एक अहवाल बनवला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

याआधीच्या मोहिमेत मृतदेह शोधण्यात नौदलाला चार दिवस प्रयत्न करून ही अपयश आल्यामुळे मृतदेहाचे तुकडे खाडीतील गाळामध्ये रुतले असावेत, अशी शक्यता गृहित धरून पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेण्यासाठी ग्रॅडिओमीटरसारख्या अत्याधुनिक यंत्रसामुग्री असलेल्या खासगी कंपनीला पाचारण केल्याचे सुत्रांनी सांगितले.