Wed, Apr 24, 2019 12:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धातूची वीट आणि तलवार आढळली

धातूची वीट आणि तलवार आढळली

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 1:40AMनवी मुंबई: प्रतिनिधी

वसई खाडीत ठाणे ग्रामीणच्या सहायक पोलीस  निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह मॅनेटोमीटरद्वारे शोधण्याची मोहीम मंगळवारी सुरु करण्यात आली. सकाळी सव्वा अकरा वाजता सुरू केलेली ही मोहीम सहा वाजता बंद करण्यात आली. यावेळी धातूसदृश असलेली एक विटेसारखी वस्तू आणि एक तलवार यावेळी मिळून आली. तब्बल 50 जणांची टीम या खाडीकिनारी तैनात होती. बुधवारी सकाळी दहा वाजता पुन्हा ऑपरेशनला सुरुवात केली जाणार आहे. 

ग्रॅडिओमीटरच्या सहाय्याने वसई-भाईंदरच्या खाडीकिनारी नऊ दिवस केलेल्या शोध मोहिमेनंतर ग्रॅडिओमीटर यंत्राच्या सहाय्याने तपासणी केल्यानंतर  नऊ ठिकाणापैकी खाडीतील दोन ठिकाणे निश्‍चित केली होती. मंगळवारी सकाळी नौदलाची एक बोट, सागरी पोलीसांच्या दोन बोटी तर शोध मोहीम घेणार्‍या कंपनीची एक बोटीसह फॉरेन्सिक टीम, रुग्णवाहिका, पोलीस खाडी किनारी तैनात होते. यामध्ये फॉरेन्सिक टीमचे 18, नौदलाच्या तीन अधिकार्‍यांसह नऊजण आणि पोलिसांचे 23 पोलीस अधिकारी -कर्मचार्‍यांचा समावेश होता.

सर्व यंत्रणा खाडी किनारी पोहोचल्यानंतर एका बोटीने थेट मॅनेटोमीटर यंत्र खाडीकिनारी पोहोचले. यावेळी जीपीआरएस तंत्राचा वापर कंपनीने केला होता. यामुळे जीपीआरएसवर गाळ आणि त्याखाली काही वस्तू आहे का? पाण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार शोधकार्यात असलेल्या यंत्रणेला ती माहिती वेळोवेळी दिली जात होती. असे सूत्रांनी सांगितले.

Tags : Mumbai, Ashwini Bidre murder case,  Metal brick sword were found, Mumbai news,