Thu, Jun 20, 2019 05:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मी माझा राजीनामा दिला आहे: अशोक चव्हाण

मी माझा राजीनामा दिला आहे: अशोक चव्हाण

Published On: May 26 2019 10:00AM | Last Updated: May 26 2019 10:06AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

लोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले असून माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. देशात जिथं-जिथं काँग्रेसला अपयश आले, तेथील सर्व प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत, असं मतही त्यांनी मांडले आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहीनीने दिलेल्या वृत्तानुसार, मी माझा राजीनामा दिला आहे. यानंतर आता काँग्रेसच्या अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अवलंबून आहे. असे अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे. यासाठी मी लवकरच राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेसची पीछेहाट होत असताना महाराष्ट्रातही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची धूळधाण उडाली. काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली. अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. खुद्द अशोक चव्हाण यांचा नांदेड लोकसभा मतदारसंघात धुव्वा उडाला. भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांनी त्यांचा ४० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला