Sat, Jul 20, 2019 11:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तेव्हाच कळले आता ‘शिमगा’ जवळ आलाय; शेलारांचे शिवसेनेला प्रत्युत्तर

तेव्हाच कळले आता ‘शिमगा’ जवळ आलाय; शेलारांचे शिवसेनेला प्रत्युत्तर

Published On: Feb 17 2018 12:24PM | Last Updated: Feb 17 2018 12:29PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा प्रकरणावर अनेक राजकीय नेत्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. सत्ताधारी नेत्यांनीही सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून सरकारवर आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. त्याच्या या टीकेला भाजप आमदार अशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या दोन्ही नेत्यांच्या ट्विटर वॉरची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

वाचा बातमी : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीला बसवा 

"मोदी"या शब्दाचे यमक जुळवून टुकार काव्य प्रभादेवीच्या गल्लीत बसून काहींना सूचले... तेव्हाच कळले आता "शिमगा" जवळ आलाय! तसा वर्षभरच यांचा शिमगाच असतो म्हणा!! उगाच "यमका" साठी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय, तीच थुंकी आपल्या तोंडावर पडू नये म्हणजे झाले..’, असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे. 

काल संजय राऊत यांनी ‘पैसे बँक मे रखो तो  नीरव मोदी का डर..घर मे  रखो तो नरेंद्र मोदी का..’ म्हणजेच लोकांनी पैसे बँकेत ठेवले तर नीरव मोदीची भिती वाटते आणि घरात ठेवले तर नरेंद्र मोदी यांची भिती वाटते, असे ट्विट केले होते. 

Image may contain: 1 person, text

Image may contain: one or more people and text