Sun, Jun 16, 2019 02:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आशाबाई मुळे प्रकरणी दुबईतून धमक्या

आशाबाई मुळे प्रकरणी दुबईतून धमक्या

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 1:39AMविरार : वार्ताहर 

माहिती अधिकार कायद्याच्या वापरातून खंडणीबहाद्दर झालेल्यांविरोधात वसईत सुरू असलेल्या मोहिमेत राजकीय नेते, माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या पाठोपाठ काही पत्रकारांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. आता वसईतील नामांकित वकील, तथा ‘बार असोसिएशन ऑफ वसई’चे अध्यक्ष अ‍ॅड. नोएल डाबरे यांना सहआरोपी करण्यात आले आहे.

वसईतील संजय कदम याच्यावर माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी मागितल्याचे दोन गुन्हे वसई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. 31 मार्च रोजी वसईतील बांधकाम व्यावयासिक खालिद शेख यांच्याकडून कदम याने साडेपाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार दिल्यानंतर कदमविरोधात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात कदम फरार होता. मात्र, अचानक वसई पोलिसांनी या गुन्ह्यात कदम याचे साथीदार म्हणून अ‍ॅड. नोएल डाबरे आणि त्यांचे सहकारी अ‍ॅड. धनंजय चव्हाण यांना सहआरोपी दाखवून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली.

त्यामुळे अ‍ॅड. डाबरे आणि अ‍ॅड. चव्हाण यांनी वसई न्यायालयातून या प्रकरणात अटकेविरोधात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवला आहे. समाजात स्वच्छ प्रतिमा असलेल्या वकिलांना सहआरोपी करताना पोलिसांनी कोणतीही शहानिशा वा  पुराव्यांची खातरजमा केली नसल्याचे, तसेच या कारवाईचा आम्ही निषेध करीत असल्याचे वकील संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे.  अ‍ॅड. डाबरे आणि त्यांच्या सहकारी वकिलावर आकस आणि सूडबुद्धीने ही तक्रार दाखल करण्यात आली असल्याने या प्रकरणाची चौकशी करून न्याय देण्याची मागणी एका ठरावाद्वारे बार असोसिएनशने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

Tags : Mumbai, mumbai news, Ashabai mule case, Threats Dubai,