Sat, Jul 20, 2019 08:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भावगीतातील शुक्रताऱ्याच्या नावामागची कहाणी!

भावगीतातील शुक्रताऱ्याच्या नावामागची कहाणी!

Published On: May 06 2018 11:55AM | Last Updated: May 06 2018 11:19AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

ज्येष्ठ भावगीतकार अरुण दाते यांचे आज वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मराठी भावगीताला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. मराठी भक्तीगीतांसोबत सोबतच त्यांनी अनेक उर्दू गीते गायली. १९६२ मध्ये त्यांच्या आवाजातील पहिली ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली होती. या गाण्याला तुफान लोकप्रियता मिळाली. अरुण दाते यांचे वडील रामूभैय्या दाते इंदूरमधील प्रतिष्ठित गायक होते. दातेंनी गायनाचा वारसा पुढे जपला. दाते यांचे लोकप्रिय गीत त्यांच्या चाहत्यांना नक्कीच माहित असेल, पण या लोकप्रिय गीतामुळे त्यांच्या नावात झालेल्या बदलाचा किस्सा कदाचित त्यांच्या बऱ्याच चाहत्यांना माहित नसेल. आई-वडिलांनी त्यांचे अरविंद असे नाव ठेवले  होते. पण त्यांच्या लोकप्रिय गाण्याने अरविंद नावाचा शुक्रतारा अरुण नावाने प्रसिद्ध झाला.  'शुक्रतारा मंदवारा' या गाण्याने दाते यांना लौकीक मिळवून दिला. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. याच गाण्यामुळे त्यांना अरुण नाव सर्वरुढ झाले.

वयाच्या ८० व्या वर्षी एका वृत्तवाहिनीच्या खास कार्यक्रमात दाते यांनी आपल्या बदललेल्या नावाचा किस्सा सांगितला होता. आकाशवाणीसाठी गाणे गायले त्यावेळी  ए. आर दाते असे नाव दिले होते. पण त्याकाळात इनिशिअल वापरत नसल्याने यशवंत देव यांनी नावात बदल केला . घरी वडिल अरु.. अशी हाक मारत असल्यामुळे देव यांनी परस्पर अरुण असे नाव केल्याचे दाते यांनी सांगितले होते. 

नावामध्ये झालेल्या बदलाचा किस्सा सांगताना दाते म्हणाले होते की, गाण लोकप्रिय झाल्यानंतर आई-वडिलांनी नाव कधी बदललेस असे विचारले होते. त्यावेळी मी नाही त्यांनीच बदलले असे मी म्हटले. माझ नाव अरविंद असल्याचे सांगत नावात बदल करण्यासंदर्भात मी देव यांच्या पाठिमागे लागलो होतो. पण माझ्याकडून चूक झाली असे सांगत त्यांनी पुढच्या गाण्यात अरविंद नाव करु असे सांगितले. नाव बदलण्याची माझी खटाटोप सुरु असताना अरुण नावाले पहिल्या गाण्याची लोकप्रियतेनंतर देव यांनी अरविंद नाव विसर आता असे म्हटले होते.    

अरुण दाते यांनी 'कुछ दिन से बेरुखीका अजब सिलसिलासा है!..ही उर्दू शायरी सर्व प्रथम पु. ल. देशपांडे यांना ऐकवली होती. होळकर कॉलेजमध्ये गॅदरिंगच्या कार्यक्रमाला पुल देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी गाणे कुणा कुणाला येत? असा प्रश्न विचारत विद्यार्थ्यांना गाणे म्हणायला सांगितले. काहींना माझ्याकडे बोट दाखवत हा सुंदर गातो असे सांगितले. यापूर्वी मी पुलंना कधीच भेटलो नव्हतो. अरविंद दाते असे नाव सांगितल्यानंतर पुलंनी रामूभैय्या दातेंचा तू कोण? असा प्रश्न विचारला होता. रामूभैय्याचा मुलगा असून तू गाणे म्हणायला लाजतो, असे पुल म्हटल्याची आठवण देखील अरुण दाते यांनी या कार्यक्रमात सांगितली होती.