मुंबई : प्रतिनिधी
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात कुर्ल्याच्या राजाच्या आगमन सोहळ्यास चिंचपोकळीतून सुरुवात झाली. ढोल ताशाच्या गजरात आगमन सोहळ्याची सुरुवात झाली. या सोहळ्याला शेकडो भाविकांनी हजेरी लावली होती.
बाप्पा माझा कुर्ल्याचा राजा तसेच आय लव कुर्ल्याचा राजाचे असंख्य फलक चिंचपोकळी विभागात लावण्यात आले होते. मुंबईतील प्रसिद्ध मूर्तिकार राहुल झुंजारराव यांच्या राहुल आर्टस कार्यशाळेतून राजाची मिरवणूक सुरू झाली. झुंजारराव यांनी यंदाच्या राजाची मनमोहक मूर्ती साकारली आहे.
कुर्ल्याच्या राजाचे यंदाचे 56 वे वर्ष आहे. राजाची 17 फुटी मुर्ती साकारताना मूर्तीभोवती तुळजाभवानी शिवरायांना देत असलेल्या तलवारीचा देखावा असलेले सिंहासन भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कुल्यार्र्च्या राजाच्या दरबारात यंदा वृक्ष वाचवा जंगल वाचवाचा संदेश देण्यासाठी ‘जंगल’ थीम साकारण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सदस्य सार्थक गायकवाड यांनी दिली.