Sat, Sep 22, 2018 06:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अर्पिता तिवारी हत्याप्रकरण : मित्राला न्यायालयीन कोठडी

अर्पिता तिवारी हत्याप्रकरण : मित्राला न्यायालयीन कोठडी

Published On: Jan 21 2018 2:50AM | Last Updated: Jan 21 2018 12:44AMमुंबई : प्रतिनिधी

अर्पिता त्रिवेणीनाथ तिवारी या मॉडेलच्या हत्येप्रकरणी तिचा मित्र अमित हाजरा याला शनिवारी बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले. अर्पिताच्या हत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. 

अर्पिता तिवारी ही मिरारोड येथे राहत होती. तिचे पंकज जाधव या तरुणाशी प्रेमसंबंध होते. 11 डिसेंबरला अर्पिता ही पंकजसोबत मानवतळ सोसायटीमध्ये पार्टीसाठी आली होती. मात्र दुसर्‍या दिवशी तिचा मृतदेह इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर पोलिसांना दिसून आला होता. तिच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मालवणी पोलिसांनी मित्र अमित हाजरा याला अटक केली होती. तो 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत होता. त्याला शनिवारी पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. 

आतापर्यंत पोलिसांनी चौदाजणांचे जबानी नोंदवले असून, तपासात अर्पिताच्या फेसबुकवर पोलिसांना काही आक्षेपार्ह संवाद दिसून आले होते. या संवादावर अमितने कमेंट दिले होते. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड वादही झाला होता. त्यामुळे अमीतने अर्पिताची हत्या केली असावी असा पोलिसांचा संशय होता. मात्र अमितने आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे.