Thu, Jul 18, 2019 20:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अर्जुन डांगळेंनी शिवसेनेची साथ सोडली

अर्जुन डांगळेंनी शिवसेनेची साथ सोडली

Published On: Jan 26 2018 1:49PM | Last Updated: Jan 26 2018 1:49PMमुंबई : विशेष प्रतिनिधी

भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते अर्जुन डांगळे यांनी शिवसेनेची साथ सोडत विरोधी पक्षांच्या सविधान बचाव रॅलीत भाग घेतला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत डांगळे यांनी शिवसेनेला साथ दिली होती. आता त्यांनी संविधान बचाव रॅलीत भाग घेतल्याने सेनेच्या गोटात खळबळ माजली आहे. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त विरोधी पक्षांकडून संविधान बचाव रॅली काढण्यात आली आहे. यामध्ये विरोधी पक्षांमधील नेत्यांसह अनेक दिग्गज नेतेमंडळींनी सहभाग घेतला आहे.  विरोधी पक्षांच्या या रॅलीला प्रत्युत्तर म्हणून भाजपने तिरंगा बचाव रॅली काढली आहे. 

अर्जुन डांगळे हे एक राजकारणी आणि साहित्यिक म्हणून ओळखले जातात. ते भारतीय रिपब्लिक पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. दलित पँथरचे संस्थापक सदस्यही आहेत.