Sun, Mar 24, 2019 06:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › होय, मी IPLमध्ये सट्टा लावला; अरबाज खानची कबुली (video)

होय, मी IPLमध्ये सट्टा लावला; अरबाज खानची कबुली (video)

Published On: Jun 02 2018 1:31PM | Last Updated: Jun 02 2018 2:34PMठाणे: पुढारी ऑनलाईन

अभिनेता आणि निर्माता अरबाज खान याने आयपीएलमध्ये सट्टा लावल्याची कबुली दिली आहे. इतक नव्हे तर सट्टेबाज सोनू जालना याला गेल्या पाच वर्षांपासून ओळखत असल्याचे अरबाजने सांगितले आहे.    

अरबाजने आयपीएलमध्ये सट्टा लावला होता. त्यात तो 2.8 कोटी रुपये हरला होता. सट्टेबाजी प्रकरणात नाव समोर आल्यानंतर त्याला समन्स पाठवण्यात आले होता. त्यानुसार अरबाज आणि सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा 11 वाजता ठाणे खंडणी गुन्हे पथकाच्या कार्यालयात पोहोचले. पोलिसांनी सोनू जालना आणि अरबाज खान यांना समोर बसून चौकशी केली. त्यात अरबाजने सट्टा लावल्याची कबूली दिली. 

ठाण्यात हजर होण्यापूर्वी अरबाजने सलमान खानची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमानच्या वकीलांची टीम या प्रकरणात अरबाजची मदत करणार आहेत. अर्थात या प्रकरणात अद्याप अरबाज खानवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही तसेच त्याला आरोपी देखील करण्यात आले नाही.  

अरबाज सट्ट्यात 2.8 कोटी रुपये हरला होता. ही रक्कम बुकी सोनू मालाड याला देण्यास टाळाटाळ केल्याची माहिती पुढे येत आहे. याप्रकरणी बुकी सोनू जालना हा रवी पुजारी मार्फत सट्ट्याचे पैसे हरलेल्या व्यक्तीकडून दुप्पट पैसे वसूल करत असल्याचे समोर आले आहे. सोनू जालना हा दाऊदसाठी काम करत असून तो रवी पुजारीकडून वसुली करत असे. 

अरबाजला सट्टा लावण्याचा नाद 

अभिनेता अरबाज खान याला सट्टा लावण्याचा नाद आहे. पण आतापर्यंत तो कधीच जिंकला नाही. अरबाज हरलेले पैसे देत नसल्यामुळे, सोनू हा अरबाज खानला धमकी देत होता.त्याच्या ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. सट्टा लावणे हा भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा मानला जातो.

काय आहे हे प्रकरण

आयपीएलच्या 11व्या हंगामात सट्टा लावल्याप्रकरणी पोलिसांनी एका बुकीला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत अरबाज खानचे नाव समोर आले होते. त्यानंतर  सोनू जालना याला अटक करण्यात आली. सोनू आंतरराष्ट्रीय पातळीवर सट्टेबाजीचे रॅकेट चालवतो. भारतीय उपखंडात देखील तो सट्टा लावतो. पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू जालनाची वर्षभराची उलाढाल 100 कोटींच्या जवळपास आहे.  दरम्यान सट्टेबाजीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीचा देखील सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात सट्टेबाज सोनू जालना आणि अन्य सट्टेबाजांसोबत अभिनेता अरबाज खान देखील दिसत आहे.