Mon, May 20, 2019 20:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आंदोलन मुंबईमध्ये, झळ बदलापूरला

आंदोलन मुंबईमध्ये, झळ बदलापूरला

Published On: Mar 20 2018 10:47AM | Last Updated: Mar 20 2018 11:01AMबदलापूर : पंकज साताळकर

बदलापूर-दादर येथे अप्रेंटीशीप करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रेल्वेच्या विरोधात रेल रोको आंदोलन केल्याने त्याचा परिणाम सकाळपासूनच उपनगरात जाणवायला लागला आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ण होत नसल्याने मध्येच खोळंबलेल्या गाड्या या उपनगरात पुन्हा येत नसल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेने कुर्ल्यापर्यंत गाड्याचा लढण्याची घोषणा जरी केली असली तरी प्रत्यक्षात मात्र कल्याणपर्यंत गाड्या सोडण्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळात आहे. त्यामुळे बदलापूरकरांनी अजून मनस्ताप नको म्हणत घरचा रस्ता गाठला त्यामुळे प्रवाशांना या आंदोलनामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी आहे. जे कुर्ला दादर मुंबई व  पश्चिम उपनगरांकडे प्रवासाला निघाले होते त्यांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला.

वाचा : विद्यार्थ्यांनी माटुंगा रेल्‍वे अडवली, वाहतूक विस्‍कळीत(व्हिडिओ)

वाचा : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सरकारचे अपयश समोर : मुंडे 

बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर डेक्कन एक्स्प्रेस थांबवण्यात आली आहे.  तसेच अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या ही बदलापूर ते वांगणी दरम्यान थांबवण्यात आल्या आहेत. एकूणच मुंबईतील सुरू असलेले हे आंदोलन सध्या उपनगरातील प्रवाशांना मात्र आपले कार्यालय गाठण्यासाठी अडसर ठरत असल्याचे दिसून येत आहे.