Mon, Jan 21, 2019 15:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिपब्लिकन ऐक्यासाठी निकष ठरवा : रामदास आठवलेंचे आवाहन

रिपब्लिकन ऐक्यासाठी निकष ठरवा : रामदास आठवलेंचे आवाहन

Published On: Dec 17 2017 3:04AM | Last Updated: Dec 17 2017 2:02AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

आंबेडकर कुटुंबासह सर्व समाजाच्या एकजुटीसाठी  रिपब्लिकन ऐक्य घडविले पाहिजे, रिपब्लिकन ऐक्य होण्यासाठी त्याबाबतचे निकष ठरवावेत, तीच खरी दिवंगत अशोकराव आंबेडकर यांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे बोलताना केले. 

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अंधेरीतील गोयंका हॉल येथे अशोक आंबेडकर यांच्या आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी भाजपचे आमदार पराग आळवणी, रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, काकासाहेब खंबाळकर, सुरेश बारशिंग, तानसेन ननावरे, जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करायची आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले. भारतीय बौद्ध महासभेचे दोन भाग पडलेत. आंबेडकर कुटुंब आणि समाज एकत्र येऊन एकच भारतीय बौद्ध महासभा स्थापन झाली तर त्याचे स्वागत होईल, असे आठवले यावेळी म्हणाले.