Fri, Sep 21, 2018 08:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अनुष्का शर्माला ‘दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्कार’

अनुष्काला ‘दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्कार’

Published On: Apr 08 2018 3:55PM | Last Updated: Apr 08 2018 4:04PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशनतर्फे दिला जाणारा  ‘दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन’ जाहीर करण्यात आला. लवकरच तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  अनुष्का नेहमीच वेगळ्या धाटनीचे चित्रपट करते. अभिनय आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 
 
'रब ने बना दी जोडी' चित्रपटातून अनुष्काने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनयात स्थिरस्थावर झाल्यावर तीने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. एनएच १०, फिलौरी, परी यांसारख्या चित्रपटांची निर्मिती तिने केली आहे. अनुष्का नेहमीच वेगळ्या धाटनीच्या भूमिका निवडताना दिसते. 

अनुष्काने भाऊ कर्णेश शर्मासोबत 'क्लीन स्लेट फिल्म्स' या कंपनीची निर्मिती केली आहे. या कंपनी अंतर्गत तिने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. वयाच्या पंचवीशीतच तिने चित्रपट निर्मिती क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. 

Tags : Anushka Sharma, Actor, Director, Producer, Virat Kohali, Dadasaheb Palke Award