Tue, Jul 16, 2019 01:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'जाणीव'च्या कार्याचा राज्यभर वाजतोय डंका

'जाणीव'च्या कार्याचा राज्यभर वाजतोय डंका

Published On: Mar 04 2018 8:33AM | Last Updated: Mar 04 2018 8:33AM4 मार्च हा एकच दिवस जर लैंगिक शोषणविरोधी दिवस म्हणून पाळायचा असेल, तर पालकांनी लैंगिकता या विषयावर आपल्या मुला - मुलींसोबत मोकळेपणाने चर्चा करण्याची गरज निर्माण झाली आहे. वाढत्या वयात आपल्या पाल्यात होणार्‍या मानसिक बदलाचा विचार करून त्यांना, त्यांच्या भावनांना समजुन आपल्यासाठी काय योग्य, काय अयोग्य आहे याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. लिंग भेद असल्यामुळे होणारे शारीरिक आकर्षण ही एक नैसर्गिक बाब असली, तरी कुठे थांबायचे हे मुलांना समजण्यासाठी संवाद हाच योग्य पर्याय आहे, असे मिलिंद पोक्षे म्हणाले.

नालासोपारा : रुतिका वेंगुर्लेकर

मुलींचे विशेषतः अल्पवयीन शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी आपल्यावर बेतणारे वाईट प्रसंग, लैंगिक शोषणावर आवाज उठवून असे कृत्य करणार्‍या वृत्ती तसेच नराधमांना ठेचले पाहिजे. यासाठी स्वतःहून पुढे येऊन आपले मौन सोडा, असे आवाहन जाणीव संस्थेच्या चुप्पी तोडो आंदोलनाचे जनक विरारमधील मिलिंद पोंक्षे आणि नालासोपारा येथील आरती वाढेर यांनी केले. 4 मार्च हा दिवस लैंगिक शोषणविरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त पुढारीशी संवाद साधताना मिलिंद पोंक्षे आणि आरती यांनी जाणीवच्या कार्याचा पट उलगडला.

पालघर जिल्हा आणि महाराष्ट्र पोलिसांबरोबर 12 ते 18 वयोगटांतील मुलींसाठी आरती वाढेर महाराष्ट्रात भय, स्पर्श, विचार, संस्कार, प्रलोभन, व्यसन, प्रभाव आणि करियर या विषयावर दीड तासाचे जनजागृतीपर व्याख्यान देत आहे. पालघर जिल्हा पोलिसांसमवेत जाणीवच्या वतीने व्याख्याने आयोजित केली जातात.

आतापर्यंत 350 शाळा-महाविद्यालयांतील 1,50,000 मुलींपर्यत आरती आणि तिचे गुरु मिलिंद पोंक्षे पोहोचले आहेत. त्यांनी आतापर्यंत 4 हजारहुन अधिक मुलींचे प्रश्न संस्थेच्या माध्यमातून सोडवले आहेत. त्यांनी जणु चुप्पी तोडो आंदोलनच छेडले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मुलींना केवळ वाचवू नका, तर त्यांना संरक्षणही द्या, असे आवाहन आरती समाजाला करत आहे.

बेटी बचाओ, बेटी पढाओ हे वाक्य कितपत संयुक्तिक आहे ? नुकताच (2 मार्च 2018) हेल्थी स्टेट्स प्रोग्रेसिव्ह इंडिया नावाचा अहवाल प्रसिद्ध झाला. त्यातील लेख वाचल्यानंतर मनात सहज विचार येतो, की बेटी बचाओ हा संदेश जगभरात वा देशभरात चालु असताना देखील भ्रुणहत्या का होत आहे ? मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी का होत चालली आहे ? याला कदाचित समाजात मुलींवर होणारे लैगिंक अत्याचार, लैंगिक शोषण, बलात्कार हे तर कारण नसावे ? कारण आज दर दिवसाआड वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रांमध्ये किशोरवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची बातमी झळकते. त्यामुळे 4 मार्च हा दिवस लैंगिक शोषणविरोधी दिवस म्हणून पाळला जातो ते योग्यच आहे असे वाटते. परंतु, असा दिवस पाळला जावा याची शोकातिंका आहे, असे आरती म्हणाली.

लैगिंक शोषण हे मुलींच्या शारीरिकच नव्हे तर मानसिकतेवरही आघात करणारा क्रुर आणि हिंसाचारी प्रकार आहे. समाजात वाढलेले विकृतीचे प्रमाण एवढे लयाला जाईल आणि मुलीला जन्म न देण्याचे कारण मुली वंश वाढवू शकत नाही, हा नसुन मुलीला जन्म दिला तर भावी आयुष्यात तिचा बलात्कार होईल हे असेल.

म्हणूनच जर दांपत्य मुलीला जन्म द्यायला घाबरत असतील तर आपला समाज, आपली विचारसरणी, समाजात मुलींसाठी असलेली सुरक्षितता या सगळ्याचा आज काय परिणाम आहे, यावर गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे, असे आरती म्हणाली. जाणीव संस्थेतर्फे किशोरवयीन मुलींची सुरक्षितता या विषयावर घेतल्या जाणार्‍या व्याख्यानानुसार असे लक्षात येते की, शेकडो मुली लैंगिक शोषणाला बळी पडल्या आहेत. त्यांची कुचंबणा, त्यांच्या मनाची तळमळ, त्यांची घुसमट समजून घ्यायला त्यांच्यासोबत, कोणीही नाही आणि विेशासार्ह व्यक्तीच जेव्हा विेशासाला तडा जाईल असे अनपेक्षित कृत्य करतात, तेव्हा विेशास कोणावर ठेवायचा? हा प्रश्‍न मुलींना सतावतो. जर मुलींवर, महिलांवर होणारे बलात्कार असेच वाढत राहिले तर लैंगिक शोषणविरोधी दिवस जगाला दररोज पाळावा लागेल, अशी भीती आरतीने व्यक्त केली.