Wed, Apr 24, 2019 15:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भ्रष्टाचाराचा कहर; उत्पन्नाच्या 1,307 टक्के अधिक माया जमवली!

भ्रष्टाचाराचा कहर; उत्पन्नाच्या 1,307 टक्के अधिक माया जमवली!

Published On: Dec 17 2017 3:04AM | Last Updated: Dec 17 2017 3:05AM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेल्या मुंबई महापालिकेचा सहाय्यक अभियंता अनिल चंद्रवर्धन मिस्त्री याने अल्पावधीतच जमवलेली संपत्ती डोळे दीपवणारी आहे. त्याची पत्नी आकृती हिने ही संपत्ती पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहून जगजाहीर केली. अर्थात हे दोघे सध्या विभक्‍त आहेत. 

1995 ला त्यांचा विवाह झाला होता. 2012 पासून ते वेगळे राहत आहेत. संपत्तीत वाटणी न दिल्याच्या कारणातून आकृतीने ही संपत्ती चव्हाट्यावर आणली असावी असा अंदाज आहे. या प्रकरणात तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी आहे अनिल मिस्त्रीची संपत्ती

> एकूण मालमत्ता - 7.72 कोटी (ज्ञात उत्पन्नाच्या तब्बल 1307% अधिक)
> आई इंदूमतीच्या नावे - 5.26 कोटी
> पत्नी आकृतीच्या नावे - 38.26 लाख
> अनिलच्या नावावर लोणावळा, मढ आयलंड, शहापूर येथे बंगले
> लोणावळा येथे जमीन
> अंधेरी पूर्वेतील आदर्शनगरमध्ये मालमत्ता
> अंधेरी आणि कांदिवलीत सदनिका चारकोप आणि अंधेरी दुकान गाळे