होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोरेगाव आगीत आणखी एकाचा मृत्यू

गोरेगाव आगीत आणखी एकाचा मृत्यू

Published On: May 29 2018 2:14AM | Last Updated: May 29 2018 1:42AMमुंबई/जोगेश्‍वरी  : वार्ताहर

गोरेगाव पश्चिमेतील टेक्निक प्लस या व्यावसायिक इमारतीच्या सातव्या मजल्यावर मोबाईल कंपनीच्या कार्यालयात शॉर्टसर्किट झाल्यामुळे रविवारी लागलेल्या भीषण आगीत शमशाद शाह (24)  या आणखी एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा आता चारवर पोहोचला आहे.  एका खाजगी कंपनीच्या मालकासह तिघांना सोमवारी गोरेगाव पोलिसांनी अटक केली. नईमउद्दीन शाह (25), राम अवतार (45), राम तीर्थपाल (45), शमशाद शाह (24) अशी मृतांची नावे आहेत.  चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते.  

मृत चारही कामगार मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. कामानिमित्त ते चौघेही मुंबईत आले होते.  सध्या ते साकिनाका परिसरात राहत होते. त्यांच्या मृत्यूची माहितीनातेवाईकांना कळविण्यात आली आहे. कर्जबाजारी कंपनीचे सामान जप्त करण्यााठी बाहेर काढताना ही आग लागली. गोरेगाव पोलिसांनी सोमवारी प्रेरणा इंटरप्रायसेज कंपनीचे मालक नितीन कोठारी आणि दोन कॉन्ट्रक्टर रमजान खान आणि समीर मणियार यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला होता.