Tue, Jan 22, 2019 23:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पीएनबीत आणखी ९.९ कोटींचा घोटाळा

पीएनबीत आणखी ९.९ कोटींचा घोटाळा

Published On: Mar 16 2018 1:26AM | Last Updated: Mar 16 2018 1:26AMमुंबई : प्रतिनिधी

प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या मामा-भाचाच्या जोडीने पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) अधिकारी, कर्मचार्‍यांच्या मदतीने केलेल्या 11 हजार 300 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास सुरू असताना बँकेच्या मुंबईतील याच शाखेमध्ये तब्बल 9.9 कोटींचा आणखी एक घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सीबीआय तपास करत आहे.

सीबीआयच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, नव्या महाघोटाळ्यामध्ये चांदरी पेपर अँड अलायंड प्रॉडक्ट्स प्रा. लि. कंपनीच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून हा घोटाळा करण्यात आला आहे.