Mon, Apr 22, 2019 06:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कपिल पाटील, जालिंदर सरोदे यांची उमेदवारी जाहीर

कपिल पाटील, जालिंदर सरोदे यांची उमेदवारी जाहीर

Published On: May 31 2018 1:42AM | Last Updated: May 31 2018 12:56AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

लोकभारतीने मुंबई पदवीधर मतदार संघातून जालिंदर सरोदे तर शिक्षक मतदार संघातून विद्यमान आमदार कपिल पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातुन शिवसेनेचे आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांना विरोध होत असला तरी डॉ. सावंत यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 

भाजप प्रणित शिक्षक परिषदेच्या ताब्यात मुंबई शिक्षक मतदार संघ होता. पण 2006 मध्ये कपिल पाटील यांनी मोठ्या फरकाने येथे विजय मिळविला. 2012 मध्ये दुसर्‍यांदा कपिल पाटील  हे 9,749 मते मिळवुन निवडून आले. तर भाजप 544, शिवसेना 631 आणि  मनसेच्या उमेदवाराला 401 मते मिळाली होती. या सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली.

मुंबई पदवीधर मतदार संघ मागिल 30 वर्षांपासुन शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्याआधी भाजपाकडे हा मतदार संघ होता. आरोग्यमंत्री डॉ. सावंत हे सध्या या मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. पण यावेळी त्यांना शिवसेनेतुन विरोध होत आहे. 

विरोधकांनी गेल्या पंधरा दिवसांपासून शिवसेना नेत्यांचे कान फुंकण्यास सुरुवात केली आहे. पण डॉ. सावंत यांच्याविरोधात त्यांच्याकडे ठोस कारणे नसल्यामुळे त्यांना शांत करण्यास सेना नेत्यांना यश आले आहे. त्यामुळे शिवसेनेकडुन पुन्हा आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनाच उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठवड्यापासुन त्यांनी मतदार आणि शिवसैनिकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. आगामी कालखंडात या घडामोडी वेगाने घडणार आहेत.