Tue, Sep 17, 2019 07:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राष्ट्रवादीच्या हातातही आता भगवा झेंडा!

राष्ट्रवादीच्या हातातही आता भगवा झेंडा!

Published On: Aug 25 2019 1:43AM | Last Updated: Aug 25 2019 1:38AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात घड्याळ निशाणी असलेला झेंडा फडकत होता, मात्र यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेला भगवा झेंडाही फडकणार आहे.

लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. राष्ट्रवादीतून अनेक नेते भाजप किंवा शिवसेनेचा भगवा झेंडा हातात घेताना दिसत आहेत. मात्र हाच भगवा झेंडा आता राष्ट्रवादीने त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात अधिकृतपणे फडकवण्याचा निर्णय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीतल्या पाथरीमध्ये आयोजित शिवस्वराज्य यात्रेत जाहीर केला. 

20 वर्षांपूर्वी म्हणजे 10 जून 1999 रोजी शिवाजी पार्कवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर घड्याळ  चिन्ह असलेला झेंडा फडकत आला आहे. त्याच्या जोडीला आता शिवरायांसह  भगवा ध्वजदेखील असेल.  

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex