Sun, Sep 23, 2018 12:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यसभेसाठी सेनेची अनिल देसाई यांना उमेदवारी

राज्यसभेसाठी सेनेची अनिल देसाई यांना उमेदवारी

Published On: Feb 25 2018 1:51AM | Last Updated: Feb 25 2018 1:51AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यसभेच्या 6 जागांसाठी राज्यात निवडणूक होणार असून शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली.

आता भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुणाला संधी देते हे पाहणे महत्वाचे आहे. 16 राज्यातील एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात ही निवडणूक होत आहे. यात उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 10, तर महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे.