Wed, Feb 26, 2020 02:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोबाईल गेमच्या वादातून महिलेने स्वतःला पेटवले

मोबाईल गेमच्या वादातून महिलेने स्वतःला पेटवले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

धारावी: प्रतिनिधी 

मोबाईलवर लुडो गेम खेळताना चिमुरडीने मोबाईल हिसकावल्याच्या कारणावरून झालेल्या पती पत्नीच्या भांडणात पत्नीने स्वतःला पेटवून दिल्याची घटना धारावीत घडली. या घटनेत पुष्पलता शक्तिप्रसाद जैना (24) हीचा भाजून मूत्यू झाला, तर पतीची मृत्यूशी झुंज सुरु आहे. 

मंगळवारी रात्री पती, पत्नी मोबाईलवर लुडो गेम खेळत होते. गेम रंगात आला असताना त्यांच्या 5 वर्षीय चिमुरडीने आईच्या हातातून मोबाईल खेचला. त्यामुळे पुष्पलताचा राग अनावर झाला. ती मुलीवर प्रचंड संतापली. यावेळी पतीने पुष्पलताच्या कचाट्यातून चिमुरडीला सोडवले. परिणामी दोघांत भांडण झाले. 

याचा राग मनात धरून पुष्पलताने रॉकेलचा डबा अंगावर ओतून स्वतःला पेटवून दिले. पती शक्तिप्रसादने प्रथम हाताने आग विझवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला पतीसह शीव रुग्णालयात दाखल केले. अवघ्या तासाभरातच पुष्पलताने अखेरचा श्वास घेतला. या घटनेत 40 टक्के भाजलेल्या शक्तिप्रसादवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.