Mon, Apr 22, 2019 11:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वे पोलिसाला लोकलखाली फेकण्याचा प्रयत्न

रेल्वे पोलिसाला लोकलखाली फेकण्याचा प्रयत्न

Published On: Apr 25 2018 2:24AM | Last Updated: Apr 25 2018 2:05AMमुंबई : प्रतिनिधी

जोगेश्‍वरी रेल्वे स्थानकात गस्त घालणार्‍या अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलिसांवर प्राणघातक हल्ला करुन एका पोलीस शिपायाला चालत्या लोकलखाली फेकून देण्याचा प्रयत्न दोन सराईत गुन्हेगारांनी केल्याची धक्‍कादायक घटना सोमवारी सायंकाळी जोगेश्‍वरी रेल्वे स्थानकात घडली. 

या झटापटीत फिरोज नन्हे हा गुन्हेगार पळून गेला तर मोहम्मद रईस रफिक शेख यास रेल्वे पोलिसांनी शिताफीने अटक केली.  त्याच्याविरुद्ध अकराहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मंगळवारी अंधेरी कोर्टाने त्याला 2 मेपर्यंत पोलीस कोठडी दिली.

वाढत्या गुन्ह्यांची दखल घेत सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेस रेल्वे स्थानकात गस्त सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे व त्यांच्या पथक विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्‍वरी रेल्वे स्थानकात गस्त घालत आहे. त्यापैकी उमेश सातार्डेकर, कैलास शहाणे, अशोक पालांडे, हातनकर आदी सहकारी जोगेश्‍वरी रेल्वे स्थानकात गस्त घालत असताना मोहम्मद रईस आणि फिरोज नन्हे हे दोघेही फलाट 2 जवळ संशयास्पद फिरताना दिसले. रईसला पोलीस ओळखतातच. पोलिसांना पाहताच दोघांनी त्यांच्यावरच हल्ला करुन दगडफेक केली. आणि अटक टाळण्यासाठी मोहम्मद रईसने ब्लेडने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान या दोघांनी पोलिसांना धावत्या लोकलखाली फेकण्याचाही प्रयत्न केला.