Mon, Apr 22, 2019 15:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अमिताभ यांची शेतकरी आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांना २.५ कोटींची मदत!

महानायक अमिताभ यांची १.५ कोटींची मदत; २०० शेतकरी कर्जमुक्त

Published On: Aug 29 2018 9:38AM | Last Updated: Aug 29 2018 9:44AMमुंबई: पुढारी ऑनलाईन

अमिताभ बच्चन यांनी चित्रपटातील भूमिकेप्रमाणेच रिअल आयुष्यात देखील महानायक असल्याचे दाखवून दिले आहे. राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अमिताभ यांनी राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या खात्यावर एक कोटी २५  लाख रुपये भरले आहेत. त्याच बरोबर शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी एक कोटी रुपये दिले आहेत. 

कालच ४४ कुटुंबियांची यादी सरकारकडून आम्हाला मिळाली. त्यांच्यासाठी आम्ही एक कोटी रुपये किमतीचे ११२ डिमांट ड्राफ्ट दिल्याचे अमिताभ यांनी सांगितले. सरकार नियमानुसार यातील ६० टक्के रक्कम शहीद जवानाच्यां पत्नीला दिली जाते तर ४० टक्क्यांपैकी २० टक्के जवानाच्या वडीलांना आणि २० टक्के रक्कम आईला दिली जाते. असे ते म्हणाले. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात मी नेहमी वाचत असतो. काही वर्षांपूर्वी मी जेव्हा एका चित्रपटाचे शूटिंग करत होतो. तेव्हा वाचले होते की केवळ १५, २० आणि ३० हजार कर्जाची रक्कम न भरता आल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. तेव्हा मी ४० ते ५० शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम भरली होती. आता कर्जबाजारी झालेल्या २०० शेतकऱ्यांचे १.२५ कोटी रुपयांच्या रक्कम कर्जखात्यावर जमा केली आहे. आम्ही बँकेतून शेतकऱ्यांच्या कर्जाची यादी घेतली आणि त्यांचे कर्ज फेडल्याचे अमिताभ यांनी सांगितले. कोन बनेगा करोड पतीच्या नव्या सिझनच्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.