Wed, Jul 24, 2019 06:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शरद पवारांनी राहुल गांधींना इजेक्शन दिलंय : अमित शहा

शरद पवारांनी राहुल गांधींना इजेक्शन दिलंय : अमित शहा

Published On: Apr 06 2018 3:01PM | Last Updated: Apr 06 2018 3:01PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

राहुल गांधी आता शरद पवारांसोबत असतात. त्यांना पवारांनी इंजेक्शन दिल्यानेच ते बोलतात असा टोला भाजापध्यक्ष अमित शहा यांनी लगावला. ते भाजप स्थापना दिनानिमित्त मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

राहुल गांधी चार वर्षांचा हिशोब मागत आहेत. पण देश तुमच्याकडून चार पिढ्यांचा हिशोब मागत आहेत त्याचे काय? असा सवाल अमित शहा यांनी राहुल गांधींना विचारला.  आम्ही सत्तेचा उपभोग घेण्यासाठी नाही तर राजकारणात सत्तेचा वापर करुन विकास करायचा आहे. मोदी सरकार याच पद्धतीने काम करत आहे असे अमित शहा यांनी सांगितले.

भाजपच्या वाटचालीबद्दल बोलताना अमित शहा म्हणाले की,‘पक्षाची सुरुवात १० सदस्यांनी झाली होती त्यांची संख्या ११ कोटींवर पोहचली आहे. एक काळ होता ज्यावेळी आम्हाला ‘हम दो, हमारे दो’ अशा टीकेला सामोरे जावे लागले. पण आज आमचे सरकार पुर्ण बहुमतात आहे. देशातील २० राज्यांत ६८ टक्के भागवर भाजपचे राज्य आहे. जोपर्यंत भाजप ओडिसा, बंगाल आणि २०१९च्या निवडणुका जिंकत नाही तोपर्यंत भाजपचा सुवर्णकाळ आला असे म्हणता येणार नाही.’

देशात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अनेक चर्चा होत आहेत पण भाजप कधीच आरक्षण हटवणार नाही. जरी कोणी आरक्षण हटवण्याचा प्रयत्न केला तर भाजप तसे करु देणार नाही असे अमित शहा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या एकत्र येण्यावर टीका करताना सगळे लांडगे आता सत्तेच्या शिकारीसाठी एकत्र आल्याचे म्हटले. ते पुढे म्हणाले की, चहावाल्याच्या नादी लागू नका. त्याचे परिणाम काय होतात ते २०१४ला सर्वांनी पाहिलं. 

या महामेळाव्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार आदी नेते उपस्थित होते

Tags : Amit Shah, PM Modi, Fadanvis, Mumbai, Foundation Day, BJP ,