Tue, May 21, 2019 18:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शुक्रवारी अमित शहा मुंबईत; भाजप करणार शक्तिप्रदर्शन

शुक्रवारी अमित शहा मुंबईत; भाजप करणार शक्तिप्रदर्शन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले असताना भाजपने आपल्या स्थापना दिनानिमित्ताने मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. 6 एप्रिल रोजी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत वांद्रे कुर्ला संकुलात भाजपचा महामेळावा होणार असून या मेळाव्याला किमान तीन लाखांची गर्दी जमवून शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी प्रदेश भाजपने केली आहे. या मेळाव्यातून भाजप लोकसभेच्या तयारीला लागणार आहे. तसेच अमित शहा यांच्या या दौर्‍यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा भाजपमध्ये आहे. 

लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून राज्यात विरोधकांनी एकजूट करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार हे स्पष्ट झाले असताना डावे पक्ष आणि संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. राज्यात शेतकरी, दलित, मुस्लीम आणि आदिवासींच्या प्रश्‍नावर आंदोलने सुरू आहेत. या पाश्‍वभूमीवर अमित शहा हे मुंबई दौर्‍यावर येत आहेत. 6 एप्रिल हा भाजपचा स्थापना दिवस असून या निमित्ताने मुंबईतील बीकेसी मैदानात भाजपचा महामेळावा होणार आहे. या मेळाव्याला राज्यभरातून भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते येणार आहेत.राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असले तरी दोघांमधील कुरबुरी सुरुच आहेत. मात्र, देश आणि राज्यात विरोधक एकवटत असताना भाजपनेही नमते घेत लोकसभेसाठी शिवसेनेसोबत युती करण्याची चर्चा सुरू केली आहे. राज्यात प्रथमच शिवसेनेनेचे 18 खासदार निवडून आले आहेत. भाजप, शिवसेना स्वतंत्र लढले तर पुन्हा ही कामगिरी करणे शिवसेनेलाही कठीण वाटत आहे. त्यामुळे शिवसेना खासदारांमध्येही युती व्हावी ही भावना आहे. त्यामुळे विधानसभेत झाली नाहीतर लोकसभेत दोन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मेळाव्यात अमित शहा शिवसेनेबाबत कोणती भूमिका घेतात याबद्दल उत्सुकता आहे. 

राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार आणि खांदेपालट करून भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. हा विस्तार याच महिन्यात केला जाणार असून अमित शहा यांच्या दौर्‍यानंतर त्याचा मुहूतर्र् काढला जाणार असल्याचे समजते. 

Tags : mumbai news, Amit Shah, Mumbai, Friday


  •