Tue, Mar 26, 2019 07:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाव बदलाचे आठवलेंकडून समर्थन, आनंदराज आंबेडकर भडकले

नाव बदल; आठवलेंकडून समर्थन, आनंदराज भडकले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे संपूर्ण नाव लिहण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी रिपब्लिकन सेना अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत संतप्त प्रतिक्रिया देत योगी सरकारचा निषेध नोंदवला.

या प्रकरणावर आनंदराज आंबेडकर म्हणाले,  'सध्या अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा गाजत आहे. या पार्श्वभूमीवरच आंबेडकरांच्या वडिलांचे 'रामजी' हे नाव जोडून राजकारण करण्याचा प्रकार सुरु करण्यात आला आहे.  दलितांची मते मिळवण्यासाठी ही खटाटोप चालली आहे.  नावापेक्षा कार्याने लोक ओळखतात. आंबेडकरांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचले आहे.' 

आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली असली तरी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मात्र, निर्णयाचे स्वागत केले आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जडण घडण करण्यात त्यांचे वडिल रामजी आंबेडकर यांचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळे सरकारी कागदपत्रांमध्ये डॉ. भीमराव रामजी आंबेडकर असे संपूर्ण नाव लिहण्याचा उत्तर प्रदेश सरकारने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे आठवलेंनी म्हटले आहे.

देशभर पुतळा फोडीचे राजकारण जोर धरत असताना योगी आदित्यनाथ सरकारने घेतलेल्या निर्णयाचे  पडसाद आता देशभर उमटत आहेत. त्यातच जर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव जर रामजी नसते तर योगी सरकारने हा निर्णय घेता असता का?  असा खोचक प्रश्न विरोधक विचारत आहेत.  

 

Tags :  Ambedkar Name Chang,  UP Ggovernment, Yogi Adityanath, Ramdas Athawale, Anand Ambedkar, Anandraj Ambedkar,BJP 


  •