Sun, Feb 17, 2019 05:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आंबेडकर स्मारक कंत्राट; अंतिम निर्णय उद्या होणार

आंबेडकर स्मारक कंत्राट; अंतिम निर्णय उद्या होणार

Published On: Dec 19 2017 2:02AM | Last Updated: Dec 19 2017 1:49AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदुमिलमधील स्मारकाचे कंत्राट देण्याबाबतचा अंतिम निर्णय एमएमआरडीए 20 डिसेंबर रोजी होणार्‍या बैठकीमध्ये घेेणार आहे. प्राधिकरणाने काढलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये शाहपुरजी पालनजी या एकाच कंपनीने निविदा सादर केली आहे. प्राधिकरणाने या स्मारकासाठी 622 कोटी रूपयांची निविदा काढली असताना या कंपनीने 783 कोटी खर्चाची निविदा सादर केली आहे. 

या स्मारकाच्या बांधकामासाठी मागवलेल्या निविदा प्रक्रियेत फक्त शाहपुरजी पालनजी या एकाच कंपनीने सहभाग घेत निविदा सादर केली आहे. यामुळे या कंपनीला कंत्राट देण्यात येणार आहे.       

2015 साली इंदुमिलच्या जागेवर आंबेडकर स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर प्राधिकरणाने बर्‍याचवेळा निविदा काढल्या. मात्र या निविदांना बांधकाम कंपन्यांचा प्रतिसाद मिळाला नव्हता. स्मारकासाठीच्या 12 एकरच्या जागेवर 350 फुट विशाल प्रतिमा उभारण्यात येणार असून वाचनालय, योग शिबिरही उभारण्यात येणार आहे.