Mon, May 27, 2019 08:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्‍यातील सर्व कॉलेज दोन फेब्रुवारी रोजी बंद  

 राज्‍यातील सर्व कॉलेज दोन फेब्रुवारी रोजी बंद  

Published On: Jan 29 2018 1:08PM | Last Updated: Jan 29 2018 1:08PMमुंबई : प्रतिनिधी
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मान्य मागण्यांच्या अंमलबजावणी व पुर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघा तर्फे राज्यात पाच टप्प्यात आंदोलन करण्यात येत आहे. चौथ्या टप्प्यात २ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व 'कनिष्ठ महाविद्यालये बंद' करून सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर व मुंबईत आझाद मैदान येथे 'जेलभरो 'आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्‍ट्र राज्‍य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा.अनिल देशमुख यांनी दिली.
शासनाने तातडीने मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत आदेश न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल व नाइलाजाने १२ वी बोर्ड परीक्षेच्या काळात 'बहिष्कार आंदोलन 'करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाचीच असेल असा इशारा संघटने तर्फे देण्यात आला आहे.
प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत.
१) १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करणे.
२) २०१२ पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन देणे.
३) सर्व शिक्षकांना २४ वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी देणे.
४) कायम विना अनुदानित शिक्षकांना अनुदान द्यावे.
५) माहिती तंत्रज्ञान शिक्षकांना अनुदान द्यावे.
६) २००३ ते २०१०-११ पर्यंतच्या वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन द्यावे.
७) सातवा वेतन आयोग तातडीने लागू करावा.