Sat, Nov 17, 2018 20:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाहतूक संपाचा मुंबईसह राज्याला फटका!

वाहतूक संपाचा मुंबईसह राज्याला फटका!

Published On: Jul 21 2018 1:31AM | Last Updated: Jul 21 2018 1:23AMमुंबई : प्रतिनिधी

मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनाचा फटका मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी बसू लागला आहे. त्यातच स्कूल बसेसनेही संपात एक दिवसाची उडी घेतल्याने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी शहरांमध्ये त्याचा परिणाम दिसला.

ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेस संघटनेच्या नेतृत्वाखाली मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी चक्‍काजाम आंदोलनाचा फटका मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी बसताना दिसला. त्यातच महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशननेही या वाहतूकदारांच्या संपात उडी घेतल्याने त्याचे पडसाद मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी शहरांमध्ये दिसून आले.

नवी मुंबई जेएनपीटी, येलो गेट, इंदिरा डॉक, कपडा बाजार, साकीनाका औद्योगिक वसाहत, म्हापे आदी भागांतील ट्रकचालकांनी संपूर्णपणे या संपात सहभाग नोंदवल्याने शुक्रवारी दिवसभरात एकही गाडी रस्त्यावर धावली नाही. त्याचा परिणाम मात्र हातावर पोट असणार्‍या हमाल आणि हातगाडी चालकांच्या उत्पन्‍नावर झाला. शिवाय, ट्रक, टेम्पोंच्या संपामुळे भाजीपाला तुडवड्याची शक्यताही निर्माण झाली आहे.