Tue, Jun 18, 2019 23:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दहा रुपयांची नाणी व्यवहारात कायम

दहा रुपयांची नाणी व्यवहारात कायम

Published On: Jan 17 2018 4:35PM | Last Updated: Jan 17 2018 4:35PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

दहा रुपयांची चलनी नाणी वैद्य असून ती चलनातून बाद करण्यात आलेली नाहीत असे रिझर्व्ह बँकेने आज (बुधवार १७ जानेवारी) स्पष्ट केले. बाजारामध्ये दहा रुपयांची नाणी व्यवहारात वापरण्यावरुन लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बँकेने ही माहिती दिली.

दहा रुपयांची १४ प्रकारची नाणी चलनात आहेत. त्यातील काही नाणी बनावट असल्याने किंवा ती चलनातून रद्द केली असल्याची खोटी माहिती लोकांमध्ये पसरली होती त्यामुळे बँकेने अधिकृतपणे १० रुपयांची नाणी व्यवहारात कायम असल्याची माहिती दिली.

रिझर्व्ह बँकेने असेही म्हटले आहे की,‘रिझर्व्ह बँकेने दहा रुपयांची १४ प्रकारची नाणी आतापर्यंत तयार केली आहेत. त्याबाबतची अधिकृत निविदा काढून व्यवहारात आणली आहेत. त्यामुळे ती नाणी सर्वत्र व्यवहारात वापरता येतील. कोणत्याही बँकेत दहा रुपयांच्या नाणी स्वीकारली जातील.’