Sat, Jul 20, 2019 23:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सागरी सामर्थ्य प्रथम शिवरायांनी ओळखले : मोदी

सागरी सामर्थ्य प्रथम शिवरायांनी ओळखले : मोदी

Published On: Feb 18 2018 6:11PM | Last Updated: Feb 18 2018 6:22PMअलिबाग : विशेष प्रतिनिधी

अखंड भारतामध्ये जगाच्या स्पर्धेत उतरण्यासाठी ज्‍या पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज होती ते काम मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. जे गेल्या 50 वर्षात झाले नाही ते कसे होवू शकते, याचे प्रात्यक्षिक आम्ही दाखविले आहे. म्हणूनच नवी मुंबई विमानतळावरून पहिले विमान डिसेंबर 2019 ला उड्डाण घेईल याची खात्री बाळगा, अशा शब्दात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या देश विकासाच्या प्रयत्नांची ग्वाही दिली.

लटकाना, अटकाना, भटकाना हेच काँग्रेसचे कल्चर : PM मोदी

पनवेलमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमीपूजन आणि जेएनपीटीच्या चौथ्या टर्मिनलचे उद्घाटन असा संयुक्‍त कार्यक्रम रविवारी दुपारी संपन्न झाला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक परिवहन, बंदरे विकास मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री अशोक गजपती, राज्यपाल सी विद्यासागर राव, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आ.प्रशांत ठाकूर व्यासपीठावर उपस्‍थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवरायांना वंदन करीत मराठीत सुरू केली. यावेळी उपस्थितांनी त्यांना टाळ्याच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले भारताला जागतिक शक्‍ती म्हणून पुढे आणावयाचे असेल तर मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभ्‍या कराव्या लागणार आहेत. सागरी सामर्थ्याची ओळख सर्वप्रथम कुणाला झाली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांना झाली होती. म्हणूनच त्यांनी सागरी किल्ल्यांची निर्मिती केली. आज जर आपल्याला जागतिक व्यापाराशी जोडले जायचे असेल तर बंदरांचे सक्षमीकरण आवश्यक आहे. म्हणूनच जेएनपीटी सारख्या आंतराष्ट्रीय सामर्थ्यशाली पोर्टची निर्मिती भारत सरकारने केली आहे. जागतिक दर्जाच्या सुविधा तेथे देण्यात येत आहेत. चौथ्‍या टर्मिनल पोर्टच्या निमित्ताने एक नवी व्यापारी शक्‍ती निर्माण झाली आहे. हा प्रकल्‍प वेळेत पुर्ण करण्यात आला. अशाच पध्दतीने रायगड जिल्हयातील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा केला जाईल. 

रायगड ही छत्रपतीं शिवाजी महाराजांची भूमी आहे. स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगड हा याच भूमीत आहे. या कोकणचा आणि महाराष्ट्राचे वैभव असलेल्या या भूमीचा कायापालट या नव्या प्रकल्पातून होईल अशी ग्वाही ही पंतप्रधानांनी यावेळी दिली. गेल्या 50 वर्षामध्ये केवळ होणेवाला हे..21 वी सदी मे आगे बढना है..’ अशी भाषणे आपण ऐकत आलो आहोत मात्र प्रत्यक्ष कृती करण्यासाठी प्रथम अटल बिहारी वाजपेयी आणि आता नरेंद्र मोदींचे सरकार यावे लागले असे सांगत, काँग्रेसचे नाव न घेता कृतीशिलता नसलेल्या शासनावर जोरदार टिकास्त्र सोडले.