Fri, Jul 19, 2019 07:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दारूच्या नशेत नर्सचा विनयभंग

दारूच्या नशेत नर्सचा विनयभंग

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 2:00AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

दारुच्या नशेत एका 24 वर्षीय नर्स तरुणीशी अश्‍लील वर्तन करुन विनयभंग करणार्‍या 31 वर्षांच्या तरुणाला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शकील अब्दुल कादर मेमन असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 

अंधेरीतील विरा देसाई रोडवर राहणारी ही तरुणी तेथीलच एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. मंगळवारी रात्री ती जोगेश्‍वरी येथून घराच्या दिशेने पायी चालत येत होती. बेहरामपाडाजवळ येताच तिच्या बाजूला एक रिक्षा थांबली. याच रिक्षात मोहम्मद शकील बसला होता. त्याने मद्यधुंद अवस्थेत होता. दारुच्या नशेत त्याने तिला घरी सोडण्याची ऑफर देत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष करुन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान तिला तिचा एक मित्र भेटला, त्याला घडलेला प्रकार सांगून तिने रिक्षाच्या दिशेने या तरुणाला दाखविले. मात्र त्याला पाहताच मोहम्मद शकील तेथून पळून गेला. 

यावेळी या दोघांनी रिक्षाचा पाठलाग करुन काही अंतरावर मोहम्मद शकीलला पकडून बेदम चोप दिला. त्याला ओशिवरा पोलीस ठाण्यात या तरुणीने त्याच्याविरुद्ध तक्रार केली. मोहम्मद शकीलविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी 354, 354 ड, 509 भादंवि सहकलम 185 मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला.