Wed, Feb 20, 2019 03:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपच्या महामेळाव्यामुळे वाहतूक कोंडी

भाजपच्या महामेळाव्यामुळे वाहतूक कोंडी

Published On: Apr 06 2018 12:55PM | Last Updated: Apr 06 2018 12:55PMमुंबई: प्रतिनिधी

स्थापना दिवसानिमित्त बीकेसीच्या मैदानावर होत असलेल्या भाजपच्या महामेळाव्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच चेंबूर, बांद्रा, दादर आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने संतप्त नागरिकांनी बांद्रा येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या बस थांबवून धरल्या होत्या. त्यामुळे येथे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

भाजपच्या महामेळाव्यामुळे मुंबईकरांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. बस, जीपमधून कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी पोहचण्यासाठी घाई करीत असल्याने या बसेस पोलीसांना कसरत करावी लागत आहे. तर काही ठिकाणी बाचाबाचीचा प्रकार घडले. भाजपाच्या या महामेळाव्यामुळे झालेल्या वाहतुक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

महामेळाव्यासाठी भाजपाचे लाखो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे बांद्रा आणि परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पश्चिम द्रूतगती मार्गावर तर कालपासूनच वाहतूक कोंडी होण्यास सुरूवात झाली होती. भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे काल आगमन झाले त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळ ते बीकेसीपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली होती त्यामुळेही वाहतूक खोळंबली होती.

Tags : BJP, Traffic jam, Road, Mumbai, Traffic Rules,