Wed, Nov 21, 2018 01:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिलायन्स एनर्जीचा गुगल तेज अ‍ॅपसोबत करार

रिलायन्स एनर्जीचा गुगल तेज अ‍ॅपसोबत करार

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 1:21AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

रिलायन्स एनर्जी या वीज वितरण क्षेत्रातील पहिल्या कंपनीने वीज देयक भरण्यासाठी युपीआय आधारित- गुगल तेज अ‍ॅपबरोबर करार केला आहे. यामुळे रिलायन्स एनर्जीच्या ग्राहकांना रांगेत उभे न राहता घर बसल्या अथवा कुठूनही सहज वीज बील भरता येणार आहे. गुगल तेज अ‍ॅपने 1 कोटी डाउनलोड मर्यादा ओलांडली आहे.

ही सेवा वापरण्यासाठी ग्राहकांना गुगल तेज अ‍ॅप डाउनलोड करावा लागणार आहे. ग्राहकांना त्यांचा बँक खाते क्रमांक त्यांच्या नोंदणीकृत फोन बँकिंग मोबाइल क्रमांकावरून ओळखावा लागणार आहे. बँक खात्यासोबत गुगल तेज अ‍ॅप मॅप झाले का ते व्हर्चुअल देयक पत्ता तयार करते. त्यामुळे देयक भरणे सोपे होते. इतर देयक पर्यायाच्या तुलनेत गुगल तेज अ‍ॅप देयक भरण्यास कमी वेळ घेते आणि यासाठी कार्डची माहिती, सीव्हीव्ही क्रमांक किंवा ओटीपी आणि इतर वेळ घेणार्‍या प्रक्रियेची गरज भासत नाही.

गुगल तेज यांच्यासमवेतच्या करारानुसार, रिलायन्स एनर्जी ही पहिली वीज वितरण कंपनी आहे, गुगल तेज अ‍ॅप हे संकेतस्थळावर आणि मोबाईलवर देयक मार्ग उपलब्ध केला आहे, असे रिलायन्स एनर्जीचे प्रवक्ते म्हणाले. याचा फायदा 25 लाख रिलायन्स एनर्जीच्या ग्राहकांना त्यांच्या घरून वा कार्यालयातून सोयीनुसार विद्युत देयक भरण्यास मदत होईल.