Tue, Jul 23, 2019 19:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बलात्कारानंतर प्रेयसीला बेदम मारहाण

बलात्कारानंतर प्रेयसीला बेदम मारहाण

Published On: Jun 17 2018 1:36AM | Last Updated: Jun 17 2018 1:36AMडोंबिवली : वार्ताहर

प्रियकराचे अन्य तरुणी सोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समजल्याने जाब विचारण्यास गेलेल्या प्रेयसीला प्रियकराने आपल्या चार मित्रांच्या मदतीने बेदम मारहाण केली. शिवाय प्रियकरासह त्याच्या एका मित्राने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दगाबाज प्रियकराने वर्षभरापूर्वीच तिला प्रेमाच्या आणाभाका आणि लग्नाचे आमिष दाखवून एका ढाब्याच्या मागे असलेल्या निर्जन इमारतीत नेऊन तिच्यावर जबरी बलात्कार केल्याचेही उघडकीस आले आहे. याप्रकरणी पीडितेने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत, तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाचे कथन करताच पोलिसांनी दगाबाज प्रियकरासह त्याच्या चार मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये तीन तरुणींचा समावेश आहे.शांतनू फारणे असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या दगाबाज प्रियकराचे नाव आहे. तर करण, अंजली, रिया, गौरी अशी इतर आरोपींचे नावे आहेत.

डोंबिवली मानपाडा पूर्व येथील कोळेगावातील एका चाळीत 27 वर्षीय तरुणी राहते. या तरुणीचे शांतनू फरणे या तरुणाशी वर्षभरापूर्वीपासून प्रेमसंबंध होते. त्यानंतर शांतनूने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत, तिला हायवे रोडवर असलेल्या एका ढाब्याच्या मागील इमारतीमध्ये जून 2017 रोजी नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. दरम्यान दगाबाज शांतनूचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे पीडित तरुणीला कळाले. 

तिने याबाबतची माहिती आपल्या मित्रांना दिली. ही बाब दगाबाज शांतनूला कळताच तो संतापला आणि आपला मित्र करणला घेऊन पीडित तरुणीच्या घरी आला व तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला.  तरुणनीने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिला मारझोड केली.