Wed, Mar 20, 2019 08:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिकनंतर रासायनिक खतांवर बंदिचा विचार : रामदास कदम

प्लास्टिकनंतर रासायनिक खतांवर बंदिचा विचार : रामदास कदम

Published On: Jun 06 2018 5:31PM | Last Updated: Jun 06 2018 5:31PMमुंबई : प्रतिनिधी

प्लास्टिक बंदीनंतर शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांवर बंदी आणण्याबाबत गांभिर्याने विचार सुरु असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित  पर्यावरण विषयक पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलताना सांगितले.

संपूर्ण जगाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील जनतेलाही प्लास्टिकच्या परिणामांची जाणीव झाली असून नागरिक स्वत:हून प्लास्टिकच्या कॅरी बॅगचा त्याग करुन कापडी पिशव्या वापरु लागले आहेत. नद्या, समुद्र, समुद्र किनारे प्लास्टिकच्या वस्तुने भरले आहेत. त्याचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच जैवविविधतेवर होत आहे. कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. शेतीत वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमुळे अन्न धान्यामध्ये विषारी घटकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कुटुंबातील अनेकांना वेगवेगळे जीव घेणे आजार जडले आहेत. म्हणूनच प्लास्टिक बंदीनंतर आता रासायनिक खते वापरण्यावरही बंदी आणण्यासाठी पर्यावरण विभाग विचार करीत असल्याचे कदम यांनी सांगितले. मी प्लास्टिकच्या वस्तू वापरणार नाही. कॅरीबॅग वापरणार नाही. कापडी पिशव्या वापरेन, असा संदेश घराघरात दिला तर शंभर टक्के प्लास्टिक बंदी होईल, असे ते म्हणाले.