Tue, Mar 26, 2019 08:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एअरटेलच्या ऑफरला जिओचे आक्रमक प्रत्युत्तर

एअरटेलच्या ऑफरला जिओचे आक्रमक प्रत्युत्तर

Published On: Jun 13 2018 10:15AM | Last Updated: Jun 13 2018 10:15AMमुंबई : प्रतिनिधी

एव्हरी डे मोअर व्हॅल्यू (ईडीएमव्ही) सेवा देण्याचे आश्‍वासन जिओ पाळत असून, इतर कंपन्यांपेक्षा जिओ आपल्या ग्राहकांना कमी शुल्क आकारत आहे. इतर कोणत्याही ऑपरेटरपेक्षा जिओकडून ग्राहकांना
ईडीएमव्हीअंतर्गत फायदे देत आहे. एअरटेलने 149 रुपये आणि 399 रुपयांच्या प्लॅनवर दररोज 1 जीबी अतिरिक्‍त डेटा देण्याची घोषणा केली. हे मोजक्याच एअरटेल ग्राहकांसाठी आहे. एअरटेलच्या ऑफरला प्रत्युत्तर म्हणून जिओ ग्राहकांना दररोज अतिरिक्‍त 1.5 जीबी 4 जी डेटा देणार आहे. डेली रिकरिंग पॅक असलेल्यांना याचा फायदा मिळेल. 149, 349, 399, 449 रुपयांचा दररोज 1.5 जीबी डेटाचा प्लॅन असलेल्या ग्राहकांना आता दररोज 3 जीबी डेटा मिळेल.

198,398, 448, 498 रुपयांचा दररोज 2 जीबी डेटाचा प्लॅन असलेल्यांना दररोज 3.5 जीबी डेटा मिळेल. 299 रुपयांच्या दररोज 3 जीबी डेटाचा प्लॅन असलेल्यांना 4.5 जीबी डेटा मिळेल. 509 रुपयांचा दररोज 4 जीबी डेटाचा प्लॅन असलेल्यांना 5.5 जीबी डेटा मिळेल. तर 799 रुपयांचा दररोज 5 जीबी डेटाचा प्लॅन असलेल्यांना 6.5 जीबी डेटा मिळेल. तर 300 रुपये आणि त्यावरील सर्व रिचार्जेसवर जिओ शंभर रुपये डिस्काउंट देणार आहे. मायजिओ ऍप अथवा फोनपे वॉलेटमधून केलेल्या 300 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या रिचार्जेसवर 20 टक्के सवलत दिली जाणार आहे.

आता जिओ ग्राहकांना मिळेल : 149 रुपयांचा पॅक 120 रुपयांना आणि दररोज 3 जीबी डेटा, मोफत कॉल, एसएमएस आणि जिओ ऍप्स 28 दिवसांसासाठी.  399 रुपयांचा पॅक 299 रुपयांना आणि दररोज 3 जीबी डेटा, मोफत कॉल, एसएमएस आणि जिओ ऍप्स 84 दिवसांसाठी.

इतर कंपन्यांच्या तुलनेत जिओ कमी शुल्क आकारणीत आघाडीवर आहे. अतिरिक्‍त डेटाचे फायदे 12 जूनला दुपारी 4 पासून सुरू होणार असून, ते 30 जूनपर्यंत मिळतील.