Tue, Sep 17, 2019 18:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ३० आठवड्यांनंतर गर्भपात नाहीः हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

३० आठवड्यांनंतर गर्भपात नाहीः हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

Published On: Jan 17 2018 2:00AM | Last Updated: Jan 17 2018 12:59AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

गर्भवती महिलेच्या मानसीक आरोग्यावर होणारा परीणाम आणि  व्याधीग्रस्त गर्भ  30 आठवड्याचा असताना तिली गर्भपाताला परवानगी देणे कायद्याने योग्य होणार नाही. तसेच गर्भपात केल्यास त्या महिलेच्या जिवीतास घोका असल्याने गर्भपाताला परवानगी देता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.

28 आठवड्यांची गर्भवती असलेल्या महिलेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन व्याधीग्रस्त गर्भ आणि त्यामुळे स्वत:च्या जिवीताला संभावत असलेला धोका याकडे लक्ष वेधत गर्भपातासाठी परवानगी देण्याची विनंती एका याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती न्यायमूर्ती आर.एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठा समोर आज झाली. 

यावेळी पुण्याच्या ससून रुग्णालयाने वैद्यकीय तपासणीचा अहवाल गर्भामध्ये गंभीर स्वरुपाच्या व्याधी असली तरी गर्भपातामुळे महिलेच्या जिवीतास धोका निमार्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने न्यायालयाने गर्भपाताला परवानगी नाकारली.