Thu, Apr 25, 2019 07:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सात वर्षांची शिक्षा

आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सात वर्षांची शिक्षा

Published On: Mar 04 2018 2:06AM | Last Updated: Mar 04 2018 1:56AMठाणे : वार्ताहर  

जव्हार तालुक्यातील आदिवासी अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्या राहत्या घरात अपरात्री घुसून बलात्कार करणार्‍या 26 वर्षीय आदिवासी तरुणाला ठाणे जिल्हा विशेष न्यायालयाचे न्या. ए. एस. भैसारे यांनी दोषी ठरवत 7 वर्षांचा सश्रम करावास व 1,500 रुपयांचा दंड, अशी शिक्षा ठोठावली. निकालात न्यायाधीशांनी डीएनए चाचणी हा निर्णायक पुरावा नसल्याचे स्पष्ट करीत शिक्षा ठोठावली. 

आई -वडील कामानिमित्त पालघर येथे असल्याने 16 वर्षीय आदिवासी तरुणी भावासोबत जव्हार तालुक्यातील धारेपैकी बोरीचामल गावात राहत होती. 2014 साली तरुणी नववीच्या वर्गात  शिकत होती. याच गावात राहणारा आरोपी  प्रभाकर लक्ष्मण गांगोडे याने एक दिवस रात्री 2 च्या सुमारास छपरावरील पत्रे काढून घरात प्रवेश केला. झोपलेल्या मुलीला धमकावत आरोपीने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. मुलीने घडलेला प्रकार घाबरून कुणालाही सांगितला नाही. त्यानंतर आरोपीने तिला ब्लॅकमेलिंग करत तुझे शूटिंग मोबाईलमध्ये केले आहे. ते सर्वांना दाखवेन, यामुळे तुझी बदनामी होईल, असा दम दिला. शिवाय मुलीला लग्नाचे अमिष दाखवून त्याने हा प्रकार सुरुच ठेवला. यामुळे काही महिन्यातच मुलगी गर्भवती राहिली व सर्व प्रकार कुटुंबियांना माहित झाला. 

यानंतर दोन्हीकडील कुटुंबीयांनी प्रकरण पंचायतीमध्ये नेले. पंचायतीने मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांत तक्रार  दिली. मात्र आरोपी  गांगोडे आणि त्याच्या कुटुंबीयांनी मुलीच्या देखभालीची हमी पंचांना दिली. अखेर 18 फेब्रुवारी,2015 रोजी मुलगी जव्हारच्या कॉटेज रुग्णालयात प्रसूत झाली. त्यानंतर आरोपीने मुलीकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली व दुसरीशी लग्न करून तिच्यासोबत राहू लागला. यावर मुलीने जव्हार पोलीस ठाण्यात तक्रार     नोंदवली.