Fri, Jul 03, 2020 21:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढविण्याबाबत बोलणं टाळलं

आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढविण्याबाबत बोलणं टाळलं

Published On: Jun 13 2019 9:00AM | Last Updated: Jun 13 2019 11:51AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. यासाठी मातोश्रीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी आज सर्व आमदार मातोश्रीवर हजर राहणार आहेत. याच दरम्यान आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. मात्र, यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत बोलणे टाळले.

माझ्या वैयक्तिक विषयापेक्षा मला शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी यांची चिंता मला आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यास माझे प्राध्यान्य राहील, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. दहावीत विद्यार्थांना कमी मार्क मिळाले आहेत, या पार्श्वभूमीवर आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांशी अकरावी प्रवेशाबाबत सकारात्मक चर्चा झाली. पुढील वर्षीपासून विद्यार्थ्यांना इंटर्नल मार्क मिळतील, असे मुख्यमंत्र्य़ांनी आश्वासन दिल्याचे आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

वाचा : आदित्य ठाकरे पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील : राऊत 

ठाकरे कुटुंबातून आतापर्यंत कोणीच निवडणूक लढवलेली नाही. पण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी निवडणूक लढवावी किंवा नाही याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली होती. 
आदित्य ठाकरे वरळी, माहिम किंवा शिवडीमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरेंनी वरळी आणि माहिम विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची दादरच्या सेनाभवनात बैठक घेतली होती. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभेची जागा सोडण्याची तयारी आमदार सुनिल शिंदे यांनी याआधीच दर्शवली आहे.

उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरेंसाठी लहान पद आहे. तरुणांचे नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून प्रतिष्ठा मिळवली आहे. आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी तरुणांमध्ये एक जबरदस्त आकर्षण आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतील अशा घडामोडी सुरू आहेत, असे मत शिवसेनेचे प्रवक्‍ते संजय राऊत यांनी व्यक्‍त केले आहे.